Sshree Astro Vastu

Passport

कृपया काळजी घ्या आत्ताच मी जाऊन आलेल्या अझरबैजानच्या टूरवर एक अनुभव आला तो तुम्हा सर्वांसोबत शेअर करावा वाटतो.

 

नुकताच एक ग्रुप घेऊन पहिल्यांदाच अझरबैजान साठी मुंबईहून निघालो, मुंबईच्या इमिग्रेशन फॉर्मॅलिटी अगदी सुरळीत पार पडल्या,  तेथून पुढे शारजाह वरून आमचे पुढील विमान होते… तेथील पण इमिग्रेशन फॉर्मलिटी पूर्ण करून पुढील प्रवास अगदी सुखरूप झाला. सर्वजण आनंदात अझरबैजानला उतरलो… जवळपास सर्व प्रवाशी इमिग्रेशन पूर्ण करून बाहेर पडले आणि लक्षात आलं की आमच्या एका सहप्रवाशाला तेथील इमिग्रेशन ऑफिसरने थांबवले आहे. मी आणि तेथील लोकल व्हेंडर दोघे मिळून त्या ऑफिसर जवळ जाऊन नक्की काय झाले ते पाहिले असता  आपल्या प्रवाशाचा पासपोर्ट चुकीचा आहे म्हणून त्याला थांबवण्यात आले होते. अक्षरशः

आमच्या प्रवाशावर तो फेक माणूस आहे, त्याचा पासपोर्ट फेक आहे, असे अनेक आरोप तो इमिग्रेशन ऑफिसर करत होता. परंतु मी वैयक्तिकरित्या त्या प्रवाशाला ओळखत होतो अगदी पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर असलेले ते प्रवासी होते अनेक देशाचा प्रवास त्यांनी केला होता त्यामुळे मला त्या माणसाबद्दल शंभर टक्के विश्वास होता. आणखी खोलात गेल्यावर कळाले की त्याच्या पासपोर्ट मधील काही पेजेस गहाळ झालेली आहेत.

डॉक्टरांशी बोलल्यावर कळाले की यात त्यांचा काही दोष नव्हता परंतु तेथील ऑफिसर काहीही ऐकण्यास तयार नव्हता आम्ही खूप प्रयत्न केले पण शेवटी आमच्या त्या प्रवाशाला तेथील ऑफिसरने डी पोर्ट केले म्हणजेच त्या देशांमध्ये प्रवेश न करू देता तसंच भारतात परत पाठवले. पूर्ण टूरचा खर्च करून आलेले ते प्रवासी विमान प्रवास, विमानाचे तिकीट आणि विशेष म्हणजे एकंदरच पूर्ण आनंदावर त्यांच्या पाणी फिरवण्यात आलं…आणि

मनस्तापाला सामोरे जावे लागले; परंतु आमचे कोणाचेही काहीही चालले नाही आणि नाविलाजास्तव त्या प्रवाशाला भारतात परत यावे लागले.

आम्ही ती टूर पूर्ण केली बाकीच्या प्रवाशासोबत आणि पुण्यात आलो त्यानंतर त्या डॉक्टर प्रवाशांची भेट घेतली आणि नक्की काय झाले आहे ते समजून घेतले.

 

तर झाले असे होते की त्यांच्या पासपोर्ट मधील काही पेज पासपोर्ट ऑफिस कडून छापण्यातच आली नव्हती किंवा त्या छपाई मध्ये मिस्टेक झाली होती. आणि त्याचा दंड या प्रवाशाला भरावा लागला होता. प्रवाशाचा विमा पण काढलेला असतो परंतु या सिच्युएशनमध्ये विमा कंपनी कोणताही मोबदला द्यायला तयार नाही, म्हणून आम्ही रीजनल पासपोर्ट ऑफिसर पुणे  यांची यासंदर्भात भेट घेतली तेव्हा त्यांच्याकडून असे उत्तर मिळाले की हे पहा “आम्ही पासपोर्टच्या इन्वोलप वर विशेष सूचना लिहिली आहे तेव्हा पासपोर्ट आल्यानंतर तुम्ही ते पूर्ण चेक केले पाहिजे” सहसा असे कोणी करत नाही आणि प्रॉब्लेम होतो परंतु याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि आलेला नवीन पासपोर्ट पूर्णतः चेक करून घेतला पाहिजे कारण पुणे पासपोर्ट ऑफिस मध्ये रोज 2000 ते 2200 पासपोर्टची छपाई होते आणि एवढ्या मोठ्या छपाई मध्ये अशा मिस्टेक झाल्या तर तिथे चेक करण्याची कोणतीही पद्धत नाही किंवा नजर चुकीने असे होऊ शकते… तर ही जबाबदारी ज्याचा पासपोर्ट आहे त्याची आहे पासपोर्ट आल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये आपण पासपोर्ट ऑफिसला कळवले तर आपल्याला पासपोर्ट बदलून मिळू शकतो परंतु आपण याची काळजी घेत नाही आणि अशा प्रसंगाला आपल्याला सामोरे जाऊ लागू नये.

 

नवीन पासपोर्ट येणाऱ्या लोकांनी आपला पासपोर्ट पूर्णपणे चेक करून घेतला पाहिजे यासाठी जनजागृती करा आम्ही ज्या प्रसंगातून गेलो त्या प्रसंगातून तुम्ही कोणी किंवा तुमचा प्रवासी जाऊ नये एवढीच इच्छा. धन्यवाद….🙏🏻

Share This Article
error: Content is protected !!
×