Sshree Astro Vastu

Out Let

लाखो जीव घेणार्‍या क्रूर  “ हिटलरने” शेवटी आत्महत्या केली !……..

               सुंदर विचार देणारे साने गुरुजी आत्मघात करुन घेतात. मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे  “ स्वामी विज्ञानानंद  ” मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.

              आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे “ भैय्युजी महाराज ” आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.

                पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही “ सुशांत सिंग राजपुतनं ” नैराश्यातून आत्महत्या केली.

                -आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या ” शीतल (आमटे) करजगी ” आपलं जीवन संपवतात.

-आजची नागपूरची बातमी  उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.

 

                या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ……..

 

                पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.

 

           माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.  त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो.  शेवटी काय…?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.

 

           भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती. त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र – श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. “ भैय्यूजी महाराज ” स्वतः एक “ अध्यात्मीक गूरू होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील 🔹स्ट्रेस🔹बाहेर काढायला त्याच्या जवळ ‼️outlet ‼️नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात – त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)

 

               ‼️इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?

होय ‼️

              कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल धरण बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे waste weir …मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक “ धरणच ” आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?

              ‼️मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.‼️

               म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे outlet  वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध…वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का.?

         

‼️म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!

हसा ! बोला ! रडा ! भांडा !व्यक्त व्हा !!  मुक्त व्हा.. !!

 

🔹काळजी घ्या.🔹

 

सोडून गेल्यावर

” ᴍɪss ʏᴏᴜ ” म्हणण्यापेक्षा

सोबत आहे तोपर्यंत ” ᴡɪᴛʜ  ʏᴏᴜ ” म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.

Share This Article
error: Content is protected !!
×