Sshree Astro Vastu

डॉक्टरीण बाई

प्रदिप केळूसकर

 

 मी अमृता, आज मी माझ्या हॉस्पिटलमधल्या कन्स्लटिंग रुम मधून तुमच्याशी बोलते आहे. आज २४ जानेवारी. काही वर्षापूर्वी २४ जानेवारीला माझ्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घडामोडीबद्दल तुम्हाला सांगायचे आहे. चला तर मग, मागे जाऊ.

 १४ जानेवारी १९९२

 माझे गाव गडहिंग्लज. आई-वडिल, मी आणि छोटा भाऊ असे छोटे कुटुंब. वडिल बँकेत नोकरीला. आणि आई गृहिणी. मी पहिल्यापासून हुशार. माझ्या आई-वडिलांना माझा खूप अभिमान. सर्व स्कॉलरशीपस् मिळवत मी दहावी बारावी झाले. मेडिकल ला जायचे निश्चित होते. त्यावेळी ‘नीट’ परिक्षा नव्हती. बारावीच्या मार्स  वर मेडिकल अ‍ॅडमिशन. मी ओपन कॅटॅगेरी मधील. त्याच्या आधी काही वर्ष राखीव जागा ठेवायला सुरुवात झाली होती. गडहिर्ंग्लज मध्ये लास वगैरे काही नव्हते. शिक्षक ज्यादा लास घ्यायचे तेवढेच. माझा अभ्यास चांगला होता. बारावीचे पेपर चांगले गेले. रिझल्ट लागला आणि मी एम.बी.एस साठी फॉर्म भरला. पण फायनल लिस्ट मध्ये माझी अ‍ॅडमिशन झाली नाही

मला फत दोन मार्स कमी होते. माझ्या पेक्षा कितीतरी कमी मार्स मिळालेल्या इतर जातीच्या मुलांना अ‍ॅडमिशन मिळाल्या. पण मला नाही. मी खूप रडले. वडिलांनी मला समजावले. ‘ आपला जन्म आपल्या हातात नसतो. तुझे नुकसान झाले आहे खरे, पण खाजगी मेडिकल कॉलेज मध्ये अ‍ॅडमिशन घेऊन भरभकम  फी भरण्याएवढी आपली परिस्थिती नाही. तेव्हा तु बी.ए.एम.एस ला अ‍ॅडमिशन घे आणि तुझी डॉटर होण्याची इच्छा पूर्ण कर.’ त्यानंतर मी कोल्हापूर मध्ये आयुर्वेद कॉलेजात अ‍ॅडमिशन घेतले आणि प्रत्येक वर्षी टॉप वर येत बी.ए.एम.एस पूर्ण केल.

 मला आता एम.डी (स्त्री रोग) करायची इच्छा होती. नव्हे ते स्वप्नच होते. यासाठी कुठे अ‍ॅडमिशन मिळेल याची चौकशी करुन शेवटी आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालय, सातारा येथे एम.डी (स्त्रीरोग)साठी अर्ज केला.

 आणि आज म्हणजे १४ जानेवारी १९९२ रोजी मला कॉलेज कडून पत्र मिळाले. २४ जानेवारी रोजी सातारा येथे सर्व कागदपत्रे घेऊन दुपारी २.०० वाजता मुलाखतीसाठी बोलावले होते. मी आनंदित झाले. त्याचबरोबर टेंशन पण आले कारण एम.डी (स्त्री रोग) साठी जागा फारच कमी असतात. आणि ओपनसाठी किती असतात याची काहीच कल्पना नव्हती. मी आईला हाक मारली. ‘आई, अगं तुला कळलं का? मला आर्यांग्ल कॉलेजमधून मुलाखतीसाठी बोलावलयं’

‘हो, का , किती तारीख?’

‘२४ तारीख दुपारी २.०० वाजता’

‘ मग आपण सकाळी एसटी ने सातार्‍यात जाऊ शकतो. ’

हो आई, सकाळी ६.०० च्या पुणे एस.टी. ने गेलो तर ११.०० वाजेपर्यंत सातार्‍यात पोहोचू. तिथे मुलाखत झाली कि लगेच निघू. रात्रौ उशीरापर्यंत घरी येऊ. अगदीच उशीर झाला तर आत्याकडे कोल्हापुरात राहू.

‘ चालेल, तुझी कागदपत्रे जमा कर  तोपर्यंत’

आणि मी धावपळ करत सर्व कागदपत्रे जमा केली. माझ्या वडिलांना मुलाखतीसाठी बोलावले म्हणून खूप आनंद झाला. पण या शाखेमध्ये फत दोन किंवा तीन शीटस् असतात. त्यामुळे मला अ‍ॅडमिशन मिळायला हवी म्हणून काळजीही वाटली. कारण अपयश मला सहन होत नाही. हे त्यांना माहीत होते.

सगळी धडपड करुन सर्व सर्टिफिकेट जमवून मी आणि आई २४ जानेवारीला सकाळी ६.०० वाजता पुणे गाडीत बसलो. छातीत धडधडत होत. जागा कमी आणि मुलं भरपूर. दुपारी १२.०० वाजता सातारा स्टॅण्डला उतरलो. सोबत पोळी भाजी चा डबा घेतला होता. कॅन्टींग मध्ये बसून तो खाल्ला. आणि रिक्षा करुन कॉलेजमध्ये आलो.

 आज अ‍ॅडमिशन असल्याने दोनशेच्या वर मुलं वेटिंग रुम मध्ये बसली होती. एवढ्या मुलांना दोन जागांसाठी पाहून मी घाबरलेच. माझी आई पण घाबरली. या मुलांमध्ये माझ्याबरोबर माझ्या कॉलेजातून बी.एम.एस झालेली मुलं पण होती. चौकशी करता करता समजले, फायनल इयरला ज्यांना जास्त मार्स त्यांनाच अ‍ॅडमिशन मिळण्याची शयता अधिक. अर्थात तोंडी मुलाखत चांगली झाली तर. मग मुलाखतींसाठी आलेल्या इतर मुलांच्या मार्सची विचारणा करता करता लक्षात आले माझे फायनल चे मार्स सर्वात जास्त आहेत. म्हणजेच मला एम.डी.साठी अ‍ॅडमिशन मिळण्याची शयता जास्त होती. धावत धावत येऊन आईला हे सांगितले. तिला पण खूप आनंद झाला. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते. आणि आमच्या घरी लँडलाईन नव्हता. त्यामुळे बाबांना हे कळवता आले नाही.

 दुपारी २.०० वाजता मुलाखती सुरु झाल्या. ३.०० वाजता माझा नंबर आला. मी सर्व सर्टिफिकेटसह आत प्रवेश केला. आर्यांग्ल कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य, इतर प्राध्यापक आणि सुपरव्हायझर रणदिवे तिथे बसले होते. आत गेल्या गेल्या सुपरव्हायझर रणदिवेंनी माझी सर्टिफिकेटस् पाहिली. त्यांनी प्राचार्यांना ति दाखविली. माझे मार्स सर्वोत्तम होते. त्यामुळे सर्व मंडळी खूश झाली. मग प्रश्नोत्तरे सुरु झाली.

‘आपल्याला  एम.बी.बी.एस ला अ‍ॅडमिशन का मिळाले नाही ?’

‘सर, मी प्रयत्न केला. पण अंतिम यादीत माझी अ‍ॅडमिशन  दोन मार्स नी हुकली. पण लहानपणापासून डॉटर होण्याचे स्वप्न होते.  ’

‘ठीक आहे. मग स्त्री रोग हाच विषय का निवडला? इतर शाखा पण असतात मेडिकलमध्ये. ’

‘सर, स्त्रियांचे आजार स्त्री डॉटरला पटकन कळतात. आणि स्त्री पेशंट स्त्री डॉटरकडे जास्त मोकळेपणाने बोलते. अजूनही आपल्या देशात स्त्री रोग तज्ञ कमी आहेत. मला त्याच शाखेला अ‍ॅडमिशन मिळावी अशी इच्छा आहे. ’

ओके म्हणत प्राचार्यांनी रणदिवेंकडे पाहिले. रणदिवेंनी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मार्सलिस्ट चेक केली. तसेच प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंबर विचारला. मग रणदिवेंनी परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मागितले. आणि माझ्या काळजात धस्स झाले. मी म्हणाले, ‘ सर, माझ्याकडे परमनंट रजिस्ट्रेशन नंबर आहे पण अजून मला परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळालेले नाही. ’

 का? प्राचार्यांनी विचारले.

‘ सर, मुंबईतील बॉम्बस्फोट आणि दंगलीमुळे बहुतेक.’

‘मग इतरांना कसे मिळाले?’ तुम्ही धडपड करायला हवी होती. परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट शिवाय आम्ही अ‍ॅडमिशन  देऊ शकत नाही. तसा नियमच आहे. सॉरी. बेटर लक नेस्ट टाईम. ’

मी घाबरून म्हणाले. सर अस करु नका. मला थोडा वेळ द्या.

मग प्राचार्य, उपप्राचार्य, आणि सुपरव्हायझर रणदिवे यांनी आपसात चर्चा केली. आणि मग प्राचार्य म्हणाले, ‘ मिस अमृता, मी तुम्हाला उद्या सायंकाळ पर्यंत मुदत देतो. हे सर्टिफिकेट उद्या सायंकाळी  ५.०० पर्यंत या ऑफिसला मिळाले तर तुमची अ‍ॅडमिशन पकी. नाहीतर सॉरी. ’

हो सर, मला तेवढीतरी मुदत द्या. मी उद्या पर्यंत परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आणून देते.

ठीक आहे, मग रणदिवे यांची अ‍ॅडमिशन उद्या ५.०० पर्यंत स्थगित ठेवा. जर यांनी उद्या ५.०० पर्यंत सर्टिफिकेट दिले तर यांना नाहीतर दुसर्‍या कोणाचीतरी अ‍ॅडमिशन पकी करा.

ओके सर म्हणत मी म्हणून बाहेर पडले.  डोळ्यात अश्रू जमा झाले होते. एम.बी.बी.एस ची अ‍ॅडमिशन दोन मार्कांनी चुकली. एम.डी. (स्त्री रोग) ची अ‍ॅडमिशन पकी होती. पण परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नव्हते म्हणून अ‍ॅडमिशन होणार नव्हते. काय करावे? वेळ फत २४ तास रजिस्ट्रेशन ऑफिस, वरळी मुंबई. येथे सातार्‍यात मी आणि आई. सोबत मोजके पैसे. अंगावरचा एकच ड्रेस. परत गडहिंग्लजला जाऊन वडिलांना घेऊन मुंबईला जाण्या एवढा वेळ नाही. आजच्या आज काहीतरी करायला हवं. मुंबईची फारशी ओळख नाही. नातेवाईक नाहीत. कुणाचीतरी मदत घ्यायलाच लागेल. मी आईला सर्व परिस्थिती सांगितली. ति घाबरलीच.

‘आता काय करणार?’ आई घाबरुन म्हणाली.

‘बघू , प्रयत्न करायलाच हवा. आई इथे सातार्‍यात कोणी ओळखीचे आहेत का आपले?’

‘इथे तुझ्या आतेची नणंद सातार्‍यात दिली आहे, पण त्यांची ओळख नाही फारशी.’

‘ति काढुया मी आतेला फोन करते. आणि आतेच्या नणंदेचा फोन घेते. आणि मग त्यांना फोन करते. बघू त्यांची काही मदत होते का?’

मी आणि आई जवळ कुठे एस.टी.डी. बुथ आहे का, शोधू लागलो पण त्या कॉलेजवळ एसटीडी बुथ नव्हता. एवढ्यात कॉलेजच्या कॅन्टींग मधून सुपरव्हायझर रणदिवे बाहेर येताना दिसले. मी त्यांच्या समोर गेले आणि त्यांना म्हटले.

‘सर, इथे जवळ एस.टी.डी.बुथ आहे का? मला इथल्या नातेवाईकांना फोन करायचा होता. ’

‘अमृता, तु धडपडतेस खरं पण उद्यापर्यंत सर्टिफिकेट आणणे कठीण होईल तुला.’

‘सर, मी १०० % सर्टिफिकेट आणणार. मला इथे एस.टी.डी बुथ कुठे आहे तो सांगा.’

अग, एस.टी.डी. बुथ इथे जवळ कुठे नाही. तिकडे राजवाड्याजवळ आहे. १ किमी लांब. एवढ्यात एक तरुण कँटींग मधून बाहेर आला. त्याच्याकडे पाहत ते म्हणाले. ‘अग, हे बघ हा आमच्या कॉलेजचा टॉपर, उमेश पोतदार. तु याच्या स्कुटरवर बसून राजवाड्याकडे जा आणि तुझे काय ते  फोन करुन घे.’ ते त्या तरुणाला म्हणाले,

‘उमेश, हिला जरा राजवाड्याकडे एस.टी.डी बुथ कडे घेवून जा. तिचे फोन झाले की परत या. ’ जा गं.

मी आईला इथेच थांब गं आई, येते. अस म्हणून त्या तरुणाच्या उमेशच्या स्कूटरवर मागे बसून राजवाड्याकडे गेले. तेथे त्याने एस.टी.डी. बुथ दाखवला आणि तो स्कूटरवर बसून माझी वाट पाहत राहिला. मी कोल्हापुरला आतेच्या घरी एस.टी.डी केला आणि तिला सर्व परिस्थिती सांगितली. आतेने तिच्या नणंदेचा फोन नंबर मला दिला. मग मी आतेच्या नणंदेला फोन लावला. तिला म्हटले, मी आणि आई तुमच्याकडे येऊ का? तिने मला पत्ता दिला आणि या म्हटले. मी परत उमेश पोतदार च्या स्कूटरवरुन कॉलेजकडे आले. उमेश ला थँस म्हटले. तो बिचारा हसून निघून गेला.

नशिबाने एक रिक्षा मिळाली आणि आई आणि मी आतेच्या नणंदेकडे आलो. या लोकांनी आमचे मनापासून स्वागत केले. आतेच्या नणंदेचे मिस्टर शाहू कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. त्यांचा मुलगा सतिश व्हेटरनरी डॉटर होता. सर्व सुशिक्षित  फॅमिली. त्यांना माझी अडचण समजली. ते काका म्हणाले, आजच्या आज मुंबईला स्वत: गेलीस तर काहीतरी उपयोग होईल.

 ‘पण आमचं मुंबईत कोणी जवळचे नाही ओ काका’

‘घाबरु नकोस, माझी मुलगी लग्न करुन दिली आहे मुंबईत. ती दादरलाच राहाते. माझ्या मुलाला तुझ्या बरोबर पाठवतो. आज रात्रौ च्या बसने दोघ मुंबईला जा. आणि उद्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जाऊन तुझ सर्टिफिकेट ताब्यात घे. ’

त्यांनी त्यांचा मुलगा सतिश ला बोलावून सांगितले. तो यायला तयार झाला. सतिश ची मिसेस माझ्याच वयाची. मि तीला माझ्याकडे अंगावरचा एकच ड्रेस असल्याचे सांगितले. तिने लगेच आपला नविन ड्रेस मला दिला. केवढे उपकार त्या लोकांचे ! आईला तेथेच ठेवले आणि थोडा दूधभात खाल्ला. आणि सतिश दादा बरोबर रात्रौ ११.०० ची मुंबई एस.टी. पकडली. सतिशदादा बरोबर होता म्हणून निर्धास्त होते. नाहीतर मुंबईत कोण होते माझे? गाडी सुटली आणि दिवसभराच्या दगदगीने मला झोप लागली. झोपेत सकाळचा इंटरव्ह्यू, प्रश्न विचारणारे प्राचार्य, रणदिवे आणि हो तो स्कुटर वरुन मला नेणारा त्या कॉलेजचा टॉपर उमेश पण येत होता. स्मार्ट हसतमुख उमेश. झोपेत मी त्याच्याशी बोलायला पाहत होते. एवढ्यात ड्रायव्हरने जोराचा ब्रेक लावला आणि मी एसटी त असल्याचे माझ्या लक्षात आले.

 झुंजुमुंजु दिसू लागलं आणि मी डोळे चोळत सकाळची मुंबई पाहत होते. जसजशी मुख्य मुंबई दिसू लागली. तसतशी आजूबाजूला बरीच जाळपोळ झालेली दिसत होती. ठिक ठिकाणी बंदुका हातात घेतलेले पोलिस फिरत होते. सहा वाजता बस परळ एसटी स्टँडवर आली. सतिश दादा आणि मी बसमधून उतरुन जरा बाहेर आलो तर बाहेर भयानक वातावरण होते. रस्त्यावर रत सांडले होते. आजूबाजूला डेड बॉडीच जळत होत्या. कवट्या फुटल्या होत्या. हातापायाचे तुटलेले अवयव रस्त्यात पडले होते. बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगल सुरु होती. रस्त्यावर चिटपाखरु नव्हते. मुंबईत कर्फ्यू होता. हे रत, डेड बॉडीज् बघून मी थरथरत होते. कडायाच्या थंडीत घाम आला होता. सतिश दादा पण घाबरला होता. एवढ्यात पोलिस जवळ आले. त्यांनी त्यांच्या राहूटीत बसायला सांगितले. चहा बिस्कीटे दिली. त्यांनी मुंबईत एवढ्या दंगलीत का आला होतात असा प्रश्न विचारला. मी सर्व हकिकत सांगितली. आजच्या आज मला परमनंट रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळण्याची आवश्यकता असल्याने मला मुंबईत याव लागलं. हे त्यांना सांगितले. त्यांनी सर्व कागदपत्रे पाहिली. आणि आठ पर्यंत कर्फ्यू असल्याने तोपर्यंत राहूटीत बसायला सांगितले. दीड तास पोलिसांबरोबर आम्ही गप्पा मारल्या. आठ वाजले. आणि मुंबईतील कर्फ्यू उठला. तस पोलिस व्हॅन मधुन पोलिस मंडळींनी आम्हाला सतिश दादाच्या बहिणीच्या घरी पोहोचवले. आम्ही येणार याची सतिश दादाच्या बहिणीला कल्पना असल्याने आणि मुंबईतील दंगलीमुळे ती मंडळी काळजी करत होती आणि वाट पाहत होती. पण ती भली माणसं होती. ओळख काढल्यानंतर लक्षात आलं. ती म्हणून लांबून लांबून आमची पाहुणीच होती. त्या ताईने मला पाणी काढून दिलं. आणि मग मी स्नान केल. सतिशदादाने पण स्नान केल. आणि त्यांचेकडे न्याहारी करुन आम्ही चालत चालत वरळीच्या दिशेने निघालो. रजिस्ट्रेशन ऑफिस वरळीला होतं. दादरवरुन वरळी ३-४ किलोमीटर. बस सर्व्हिस थोडी फार सुरु होती. पण बसवर दगडफेक झाली की लगेच बंद होत होती. म्हणून चालत जायचा निर्णय घेतला. वाटेत ठिकठिकाणी दंगलीच्या खुणा दिसत होत्या. बहुतेक दुकाने बंद होती. शाळा बंद होत्या. घाबरत घाबरत पण सावधपणे आम्ही चालत होतो. १२.०० च्या सुमारास आम्ही रजिस्ट्रेशन ऑफिसच्या बिल्डींगपर्यंत पोहोचलो. आजूबाजूची बहुतेक ऑफिसे बंद होती. रस्त्यावर शुकशुकाट होता. मला आता टेंशन येत होत. एवढी धडपड करुन आम्ही मुंबईला आलो खरं पण माझ काम होणार? की पुन्हा अपयश….

सतिश दादा मला धीर देत होता. त्या बिल्डींगच्या अगदी वरच्या मजल्यावर ते ऑफिस होत. तीन मजले चढून जायचे होते. आम्ही दोघ हळूहळू जीने चढत होतो. पहिल्याच मजल्यावर अचानक एक काळ मांजर आडव आलं. सतिशदादा घाबरला. नर्व्हस झाला. मी दादाला म्हटले. ‘ मांजर आडव आलं ना, आता माझ काम निश्चित होणार.’ तो म्हणाला, काळ मांजर आडव आल तरी तुझ काम होणार म्हणतेस.

हो, हो, काम होत की नाही बघ. मी त्याला आत्मविश्वासाने म्हटलं. एवढ्यात पन्नाशीचे एक इनशर्ट केलेले गृहस्थ आमच्या बाजूने खाली गेले. मी त्यांचेकडे पाहात पायर्‍या चढले. शेवटी एकदाचे रजिस्ट्रेशन ऑफिसला पोहोचले. तेथे एकच शिपाई बसला होता. मि त्याला म्हटले, ‘दादा, मी सातार्‍याहून आले आहे. माझे एम.डी.चे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट न आल्याने मला या दंगलीत मुंबईत यावे लागले. कसंही करुन आजच्या आज मला ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळायला हवं.’ तो म्हणाला  ‘आत्ताच ते म्हापणकर साहेब येथे होते. काही काम नाही म्हणून घरी जातो म्हणाले.’

‘आत्ता खाली गेले ते इनशर्ट वाले काय?’

हो हो आत्ताच खाली गेले तेच ते.

त्यांचे शेवटचे वाय न ऐकताच मी धावत अक्षरश: उड्या मारीत जिना उतरु लागले. धडाधड धडाधड धावत अर्ध्या मिनिटांत त्या गृहस्थांच्या समोर उभे राहिले. एवढी धावत आल्याने माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. मोठे श्वास घेत मी बोलू लागले. ‘सर, मी सातार्‍याहून आले आहे. माझं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट न मिळाल्याने माझी एम.डी.ची अ‍ॅडमिशन थांबली आहे. आज सायंकाळपर्यंत मला सर्टिफिकेट सादर करावीच लागेल. अन्यथा …. प्लीज सर. एवढ्या दंगलीत मी मुंबईत आले आहे .’

माझी ती परिस्थिती बघुन म्हापणकर सर म्हणाले, ओके ओके. तुम्ही वेळेवर आलात. अन्यथा मी गेलो असतो. असे म्हणून ते गृहस्थ माझ्याबरोबर वर आले. सतिश दादा ऑफिस मध्ये बसलेलाच होता. म्हापणकर सरांनी माझ्या हातून माझा नंबर घेतला आणि ते सर्टिफिकेट शोधू लागले. शेवटी एका गठ्ठयात माझ्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची डुप्लीकेट त्यांना सापडली. ती दाखवत ते मला म्हणाले. ‘हे बघा मॅडम, तुमचे सर्टिफिकेट पोस्टाने पाठवलयं. पण या दंगलीमुळे सध्या पोस्टाच्या गाड्या बाहेरगावी जात नाही आहेत. त्यामुळे बहुतेक तुम्हाला हे मिळाले नसेल. मी याची डुप्लीकेट तुम्हाला देऊ शकतो. ’

‘पण सर, आज पाच वाजेपर्यंत मला हे सर्टिफिकेट कॉलेजमध्ये द्यायचे आहेत. अन्यथा…’

‘ओके. मी तुमच्या कॉलेजला फोन करुन सांगतो. असं म्हणून त्या भल्या गृहस्थाने माझ्याकडुन कॉलेजचा फोन नंबर घेतला आणि ऑफिसच्या एस.टी.डी फोन वरुन फोन लावला. सुदैवाने फोनवर रणदिवेच होते. त्यांनी रणदिवेंना अमृता फलटणकरचे सर्टिफिकेट पोस्टाने पाठवलेले आहे. पण मुंबईतील दंगलीमुळे ते तिला मिळाले नसल्याचे सांगितले.’ रणदिवेंनी त्यांना वरील सर्टिफिकेट फॅस ने पाठवायला सांगितले आणि ऑफिसमधील प्यून ने तातडीने फॅस करून कॉलेजला पाठविले. दोन मिनिटात रणदिवेंचा सर्टिफिकेट मिळाल्याचा फोन आला. आणि अशा रितीने माझे  अ‍ॅडमिशन पके झाले.

 मी या ऑफिसर म्हापणकरांचे मनापासून आभार मानले. त्या प्यून दादाचे आभार मानले. आणि आम्ही दोघ परळ एसटी डेपो कडे निघालो. तेथे पुणे गाडी लागलेलीच होती. ति पकडून सायंकाळी सहा पर्यंत पुण्यात पोहोचलो. दुसरी कोल्हापुर गाडी पकडून रात्री नऊ वाजता सातार्‍यात पोहोचलो. सतिश दादा माझ्या पाठीमागे पर्वतासारखा उभा राहिला म्हणून हे शय झाल.

 दुसर्‍या दिवशी सकाळी त्या सर्व मंडळींचे पुन्हा पुन्हा आभार मानत एसटी ने दुपारपर्यंत घर गाठल. दोन दिवसाची माझी एवढी धडपड ऐकून बाबांना खूप आनंद झाला. माझी अ‍ॅडमिशन झाली आणि पुढील  दोन वर्षात मी एम.डी. (स्त्री रोग) पूर्ण केल.

 मघापासून मी तुम्हाला २४ जानेवारी  १९९२ ची गोष्ट सांगतेय. त्या एका दिवसात मी जीवनातील थरार अनुभवला. आणि अडचणीवर मात कशी करायची हे शिकले.

 आता हे सारे मी माझ्या कन्स्ल्टींग रुम मधून बोलते आहे. पण शेवटी महत्वाचे सांगायचे राहिले. ते म्हणजे सातार्‍यात फोन करण्यासाठी मला स्कुटरवरुन नेणारा आणणारा तो हिरो आठवतो ?. उमेश पोतदार. अहो एम. डी. झाल्यानंतर त्याच्या स्कुटरची मागची सीट मी कायमची पटकावली. म्हणजेच मि मिसेस अमृता उमेश पोतदार झाले. आम्ही दोघांनी कोकणात लहानश्या गावात हॉस्पिटल काढले.

 झाली या घटनेला जवळजवळ वीस वर्ष. आता आमची मुलगी एम.बी.बी.एस ला आहे. पण दर वर्षी २४ जानेवारी आली की मला सातार्‍याचे आर्यांग्ल कॉलेज आठवते. आणि भर दंगलीत मुंबईत जाणारी मी आणि सतिश दादा आठवतो.

Share This Article
×