Sshree Astro Vastu

हे केल्यास आयुष्यात त्वचारोग (Skin Disease) होत नाही!!!

काही स्वस्त गोष्टींमध्ये अनेक औषधी गुण असतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो, मात्र याकडे आता दुर्लक्ष करू नका, पुढे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर सतत 8 दिवस अंघोळ केली, तर तुम्हाला आयुष्यात चर्मरोग होणार नाही.

 

*त्वचेला खाज सुटण्यासारखे प्रकार.*

 

अनेक वेळा शरीरावर लहानसहान बॅक्टेरिया असतात, त्यामुळे त्वचेला खाज सुटण्यासारखे प्रकार होतात, ते देखील बंद होतील.

 

*10 रूपया एक आंघोळ*

 

तुरटी जी सहज किराणा दुकानावर उपलब्ध होते, 10 रूपयाला 50 किंवा 100 ग्रॅम असा तुरटीचा भाव आहे. एका प्लास्टीकच्या बाटलीत तुरटीचे लहानलहान तुकडे करून टाका, पाणी टाका. यानंतर तुरटीचे द्रावण तयार होईल.

 

*अशा ठिकाणी जास्त लावा*

 

हे द्रावण अंगाला अशा ठिकाणी लावा, ज्या ठिकाणी घाम जमा होणे, अथवा खाज सुटण्याची शक्यता अधिक असते, जसे डोके, खाकेत आणि मांड्यांच्या मध्ये. खाकेत तुरटीचे द्रावण लावल्याने दुर्गंधी जाण्यासही मदत होते.

*वस्तू एक, उपाय अनेक*

 

तुरटीचे हे द्रावण लावल्यानंतर पाच मिनिटात सुकते, सुकल्यानंतर पांढरे स्फटीक स्पष्ट दिसतात, यानंतर अंघोळ करा, अशी आंघोळ सतत 8 दिवस आणि वर्षभरात 4 वेळा केल्यास, तुम्हाला कजकर्ण, नायटा यासारखे आजार अजिबात होणार नाहीत. शिवाय शरीराची दुर्गंधी येणार नाही, केसांत चाई देखील होणार नाही.

 

*थोडीशी काळजीही आवश्यक*

 

*आंघोळ करताना तुरटीचे पाणी डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या, हे पाणी डोळ्यात गेल्यास अधिक जळजळ होते. यासाठी डोके धुतांना डोळे घट्ट मिटा.*

    

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी  हा ग्रुप जॉईन करा* our w app link

 

*माहिती आवडली तर आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता इतर ग्रुप वर शेअर करा **

Share This Article
error: Content is protected !!
×